Majhi Kanya Bhagyashree Yojana

माझी कन्या भाग्यश्री योजना 2023

महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 (Majhi Kanya Bhagyashree Yojana) सुरु करण्याचा उद्देश मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारत्मक विचार निर्माण करणे, लिंग निवडीस प्रतिबंध घालणे तसेच मुलींच्या शिक्षणाविषयी समाजाला प्रोत्साहन देणे, समाजामध्ये परंपरेनुसार मुलाच्या जन्मावर आनंदोत्सव साजरा केल्या जातो परंतु मुलींच्या जन्मानंतर असे घडत नाही, जनमानसाची हि मुलींबद्दलची मानसिकता बदलविणे आणि त्यांना मुलींचे योग्य पालनपोषण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत शासनाकडून आर्थिक सहाय्य केले जाते, या योजने अंतर्गत मिळणाऱ्या आर्थीक मदतीव्दारे मुलीनी आपले शक्षण पूर्ण करावे जेणेकरून पुढे निर्माण होणारी मातांची पिढी हि शिक्षित होईल आणि त्यामुळे पुढे येणारी त्यांची मुले व मुली आरोग्यसंपन्न आणि शिक्षित निर्माण होईल व त्यामुळे मुलगा आणि मुलगी हा भेदभाव कमी होण्यास मदत होईल, हा शासनाचा उद्देश आहे.

योजनामाझी कन्या भाग्यश्री योजना
राज्यमहाराष्ट्र
योजनेची सुरुवात1 एप्रिल 2016
अधिकृत वेबसाईटmaharashtra.gov.in
लाभार्थीराज्याच्या मुली
उद्देशमुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक व्यवस्था करणे
व्दारा सुरुमहाराष्ट्र सरकार
विभागमहिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र

महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजना लाभ Majhi Kanya Bhagyashree Yojana (Benefits)

 • माझी कन्या भाग्यश्री योजना सुधारित दिनांक 1 ऑगस्ट 2017 पासून नवीन निर्णयाप्रमाणे ज्या परिवारचे वार्षिक उत्पन्न 7.5 लाख रुपये पर्यंत आहे अशा समाजातील सर्व नागरीकांसाठी लागू करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ खालीलप्रमाणे राहील.
 • पहिल्या प्रकारामध्ये कुटुंबामध्ये एका मुलीनंतर, मातेने किंवा पित्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर शासनाकडून मिळणारी अनुदानाची रक्कम रुपये 50,000/- राष्ट्रीयकृत बँकमध्ये मुदत ठेव योजनेत गुंविण्यात येईल.
 • यानंतर बँकेमध्ये मुलीच्या नावे मुदत ठेवीत गुंतविलेले 50,000 रुपये रकमेवर सहा वर्षात देय असलेले फक्त व्याज मुलीला वयाच्या सहाव्या वर्षी काढता येईल.
 • पुढे पुन्हा मुद्दल 50,000/- रुपये मुदत ठेवीत गुंतवणूक करून सहा वर्षासाठी देय असलेले फक्त व्याज वयाच्या बाराव्या वर्षी मुलीला काढता येईल त्यांनंतर पुढे पुन्हा 50,000/- रुपये मुदत ठेवीत गुंतवणूक करून सहा वर्षासाठी देय असलेले व्याज प्लस मुद्दल दोन्ही रक्कम वयाच्या अठराव्या वर्षी मुलीला काढता येईल.
 • कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाल्यांनंतर माता किंवा पित्याने परिवार नियोजन शस्त्रक्रिया केली असेल आणि तसे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच 50,000/- रुपये एवढी रक्कम मुलीच्या नावाने जमा केल्या जाईल आणि अशा प्रकारे बँकमध्ये मुदत ठेवीमध्ये जमा केलेल्या रकमेवर त्यावेळी मुलीच्या वयानुसार देय असलेली व्याजाची रक्कम मुलीला मिळण्यात येईल.
 • दुसऱ्या प्रकारामध्ये कुटुंबामध्ये दोन मुलीनंतर मातेने किंवा पित्याने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर शासनाकडून देय असलेली अनुदानाची रक्कम पहिल्या आणि दुसऱ्या मुलीच्या नावाने प्रत्येकी रुपये 25,000/- याप्रमाणे 50,000/- रुपये एवढी रक्कम दोन्ही मुलींच्या नावाने बँकेमध्ये मुदत ठेव योजनेमध्ये गुंतविण्यात येईल.
 • त्यानंतर बँकेमध्ये मुलीच्या नावे मुदत ठेवीत गुंतविलेले 25,000 रुपये रकमेवर सहा वर्षात देय असलेले फक्त व्याज मुलीला वयाच्या साहव्या वर्षी काढता येईल. पुढे पुन्हा मुद्दल 25,000/- रुपये मुदत ठेवीत गुंतवणूक करून सहा वर्षासाठी देय असलेले फक्त व्याज वयाच्या बाराव्या वर्षी मुलीला काढता येईल.
 • त्यांनंतर पुढे पुन्हा 25,000/- रुपये मुदत ठेवीत गुंतवणूक करून सहा वर्षासाठी देय असलेले व्याज प्लस मुद्दल दोन्ही रक्कम वयाच्या अठराव्या वर्षी मुलीला काढता येईल.
 • कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झाल्यांनंतर माता किंवा पित्याने परिवार नियोजन शस्त्रक्रिया केली असेल आणि तसे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच 25,000/- रुपये एवढी रक्कम मुलीच्या नावाने जमा केल्या जाईल आणि अशा प्रकारे बँकमध्ये मुदत ठेवीमध्ये जमा केलेल्या रकमेवर त्यावेळी मुलीच्या वयानुसार देय असलेली व्याजाची रक्कम मुलीला मिळण्यात येईल.

माझी कन्या भाग्यश्री योजना आवश्यक कागदपत्र

 • लाभार्थी मुलीचे पालक महाराष्ट्राचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे, पालकाचे अधिकृत राहिवासी प्रमाणपत्र
 • मुलींचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र
 • लाभार्थी कुटुंबाने योजनेसाठी अर्ज करतेवेळी एका मुलीनंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र
 • योजनेसाठी अर्ज कारणाना लाभार्थी कुटुंबाने दोन मुलींच्या नंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
 • अर्जदाराचे आधार कार्ड
 • BPL श्रेणी रेशनकार्ड
 • मिळकत प्रमाणपत्र
 • अर्जदाराचे मोबाइल नंबर
 • मुलीचे व मातेचे बँक पासबुक
 • पासपोर्ट साईज फोटो