Purnima Full Blue Moon

Purnima Full Blue Moon

Purnima Full Blue Moon – येत्या ३१ ऑक्टोबरला दिसणारा पौर्णिमेचा चंद्र ‘ब्ल्यू मून’ म्हणून ओळखला जाईल. एकाच महिन्यात दोन पौर्णिमा आल्यास त्यांपैकी दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ‘ब्ल्यू मून’ म्हटले जाते.

Krushi Sevak Bharti 2023

या महिन्यात दोन ऑक्टोबरला पहिली पौर्णिमा होती. ही खगोलशास्त्रीय घटना नसून, चंद्र निळा दिसणार नसल्याचे खगोल अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.

या घटनेबाबत ‘नेहरू तारांगण’चे संचालक अरविंद परांजपे म्हणाले, ‘ब्ल्यू मून ही पाश्चिमात्य संकल्पना असून, तिचा उगम सतराव्या शतकात सापडतो. युरोपमध्ये वसंत, उन्हाळा, शरद आणि हिवाळा असे चार ऋतू असतात.

साधारणपणे १२ महिन्यांमधील या चार ऋतूंमध्ये प्रत्येकी तीन पौर्णिमा येतात. मात्र, काही वेळा एका ऋतूत चार पौर्णिमा येतात.

अशा वेळी त्या ऋतुमधील तिसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ‘ब्ल्यू मून’ म्हटले जाते.”विसाव्या शतकाच्या मध्यापासून एका महिन्यात दोन पौर्णिमा आल्यास त्यांपैकी दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ‘ब्ल्यू मून’ म्हणून संबोधले जाऊ लागले; तरीही तेव्हा चंद्र निळा दिसत नाही. खगोलशास्त्रीयदृष्ट्या त्याच्या गुणधर्मांमध्ये कोणताही फरक पडत नाही. त्यामुळे ‘ब्ल्यू मून’संबंधी अफवांवर विश्वास ठेवू नये,’ असे आवाहन परांजपे यांनी केले आहे.

30 ऑगस्ट 2023 रोजी रात्री ठीक 8:37 वाजता EDT, सुपर ब्लू मून त्याच्या कमाल ब्राइटनेसपर्यंत पोहोचेल.